एप्रिल 2017, Post Graduation चे शेवटचे वर्ष, प्रत्येक जण भविष्यात काय करायचे या बदल विचार करत होता,माझ्या डोक्यात असे काही विचार येत नव्हते मला काहीतरी वेगळे करायचे होते, पण घरच्यांच्या हटा पायी मी एका ठिकाणी जॉब interview दिला आणि मी सिलेक्ट झालो, पुढील 6 महिने जॉब केला, 12 तास बाहेर आणि 12 तास घरी अशी परिस्थिती होती, मनापासून विचारायला गेल्यास ते मला करायचे नव्हते, विचार केला काही तरी वेगळे करायचे आणि जॉब सोडला.

बऱ्याच लोकांनी वेग वेगळे सल्ले दिले पण मला ते पटत नव्हते, एकदा इंटरनेट वरती ब्राउस करता वेळेस एक वेबिनार ची ऍड दिसली आणि मी तो जॉईन केला, त्या वेबिनार मध्ये तो मुलगा सांगत होता एका नवीन विश्वा बदल म्हणजेच डिजिटल मार्केटिंग बदल, मला एक समजलं इंटरनेट वरती मार्केटिंग करायची असते आणि आपला व्यवसाय वाढतो पण अजून एक गोष्ट आवडली ती म्हणजे वेबिनार घेणारी व्यक्ती बोलली की तुम्ही जिथे 50 हजार रुपये महिना या प्रमाणे काम करता तिथे सोशल मीडिया मार्केटिंग एजन्सी सुरू करून एका क्लायंट कडून तेवढे पैसे मिळवू शकता, मला हे खूप छान वाटलं, मी त्या व्यक्ती वर विश्वास ठेवला, कोर्स जॉईन केला आणि शिकत गेलो.

पुढील 2 वर्षात अनेक क्लायंट सोबत काम केले, काही बाहेर देशातील होते, सर्वाना बऱ्यापैकी रिझर्ल्ट हा येत होता.

हे करत असता वेळेस काही मराठी फेसबुक ग्रुप सोबत जोडलो गेलो होतो आणि मराठी माणसे त्या ग्रुप वर ऍड पब्लिश करायचे, मी त्या ग्रुप वर पोल घेतले, लोकांना विचारले तेंव्हा लक्षात आले की डिजिटल मार्केटिंग बदल म्हणावे तेवढे knowledge लोकांना नाही आहे आणि मी पुण्या मध्ये आवड म्हणून ओर्कशॉप घ्यायला सुरुवात केली, लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला, लोकांना फायदा होत होता.

हे सगळे करत असताना मला एक लक्षात आले की कामामध्ये मिशन हे असले पाहिजे, त्या मुळे मी ठरवले की मला मराठी व्यवसायिकांना मदत करायची आणि एक लाख मराठी उद्योजकांना डिजिटल मार्केटिंग चा उपयोग करून व्यवसाय वाढीस मदत करणे हे ध्येय ठरवले. त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाले , आणि अवघ्या 6 महिन्यात मी 50 हजारापेक्षा जास्त लोकांना ट्रेन केले आणि त्यांना डिजिटल मार्केटिंग चे महत्व पटवून दिले.

माझा प्रामाणिक उद्देश मराठी व्यवसायिकांना मदत करणे हा असून त्या साठी मी मनापासून प्रयत्न करत आहे.